रिझर्व्ह बँक – एकात्मिक लोकपाल योजना, 2021

www.rbi.org.in

RBI ने त्यांच्या तीन लोकपाल योजनांचे एकत्रीकरण केले आहे, जसे की, (i) बँकिंग लोकपाल योजना, 2006; (ii) नॉन-बँकिंग वित्त कंपन्यांसाठी लोकपाल योजना 2018; आणि (iii) डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजना, 2019 करता एक एकात्मिक लोकपाल योजना 2021

प्रभावी तारीख :

एकात्मिक लोकपाल योजना 2021, 12 नोव्हेंबर 2021 पासून लागू आहे

लोकपालाकडे तक्रार दाखल करण्याचे कारण :

MMFSL द्वारे सेवेच्या कमतरतेशी संबंधित तक्रार खालील घटना घडल्यानंतर 1 वर्षाच्या आत दाखल केली जाऊ शकते:

  • MMFSL.ने ही तक्रार पूर्णपणे / अंशत: नाकारली आहे; किंवा
  • प्रतिसाद समाधानकारक नाही; अथवा
  • MMFSL कडून तक्रार दाखल करण्यापासून 30 दिवसांच्या आत कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया :

या उद्देशाने तयार केलेल्या पोर्टलद्वारे तक्रार ऑनलाइन दाखल केली जाऊ शकते (https://cms.rbi.org.in) .

रिझव्‍‌र्ह बँकेने अधिसूचित केल्यानुसार तक्रार इलेक्ट्रॉनिक किंवा फिजिकल पद्धतीने सेंट्रलाइज्ड रिसीट आणि प्रोसेसिंग सेंटरकडे देखील सादर केली जाऊ शकते.

लोकपाल कडून निवाडा :

निवाड्याची प्रत मिळाल्यापासून तक्रारदाराने 30 दिवसाचे आत MMFSL ला निवाड्याचे स्वीकृती पत्र (समाधानी असल्यास) सादर करावे.

MMFSL ला तक्रारदाराकडून स्वीकृतीचे पत्र मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत निवाडा लागू करेल.

अपील:

निवाडा मिळाल्यापासून किंवा तक्रार नाकारल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत, एखाद्या निवाड्या मुळे किंवा तक्रार नाकारल्यामुळे ग्राहक नाराज असल्यास तो अपील प्राधिकरणाकडे अपील करू शकतो

सामान्य :

  • लोकपालापुढे आणता येईल अशा वादग्रस्त रकमेवर मर्यादा नाही, ज्यासाठी लोकपाल निवाडा करू शकतो
  • योजनेंतर्गत चालु ठेवण्यायोग्य नसल्यास, लोकपाल/उपलोकपाल अनुपालनकर्त्यास नाकारू शकतात
  • ही एक वैकल्पिक विवाद निवारण यंत्रणा आहे
  • ग्राहकाला कोणत्याही टप्प्यावर निवारणासाठी इतर कोणत्याही न्यायालय / मंच / प्राधिकरणाकडे जाण्याचे स्वातंत्र्य आहे, तथापि अशा परिस्थितीत तो / ती RBI लोकपालाकडे जाऊ शकणार नाही
  • योजनेची अधिक माहिती हवी असल्यास : संपर्क: www.rbi.org.in
  • ही योजना MMFSL च्या शाखां मध्येही उपलब्ध आहे .

अधिक माहितीसाठी, पहा: "रिझर्व्ह बँक - एकात्मिक लोकपाल योजना, 2021":

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000