न्याय्य प्रक्रियेसाठी संहिता

कर्जासाठी आणि त्याच्या प्रक्रियेसाठी अर्ज

 • ज्या ग्राहकांनी MMFSL कडून कर्ज घेण्यात रस दर्शविला असेल त्यांनी कर्ज मागणी अर्ज भरावा, सर्व बाबी पूर्ण कराव्यात आणि तो कंपनीच्या जवळच्या शाखेत सादर करावा.
 • अशा प्रकारे प्राप्त झालेल्या अर्जाची पोच, अर्ज सादर केल्यावर कंपनीकडून त्वरित दिली जाईल आणि कर्ज मंजुरीसाठी त्यावर प्रक्रिया केली जाईल. सादर केलेली सर्व कागदपत्रे आणि प्रदान केलेली माहिती विचारात घेऊन, कंपनी ग्राहकाची पत पडताळणी करेल आणि स्वतःच्या अधिकारात प्रस्तावाचे मूल्यांकन करून, कर्ज मागणी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून १० दिवसांच्या आत, मंजूरी पत्र देऊन कर्ज मंजूर करेल आणि ग्राहकास कोणताही संदेश प्राप्त न झाल्यास, कर्जाचा अर्ज नाकारला गेला आहे असे मानले जाईल आणि नाकारलेल्या प्रकरणांसाठी कंपनी कोणताही संदेश पाठविणार नाही.
 • योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून, ज्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे अशा सर्व कर्जदारांना स्थानिक भाषेतून मंजुरी पत्र दिले जावे.

कर्जाचे मूल्यांकन आणि अटी व शर्ती

 • स्थानिक भाषेतील मंजुरी पत्राद्वारे खालील गोष्टी कळवल्या जातील:
  • वित्तपुरवठा रक्कम,
  • कर्जाचे वितरण करण्यासाठी सादर करण्याची कागदपत्रे,
  • व्याजाचा दर,
  • देऊ केलेल्या तारणाचा तपशील,
  • परतफेडीचे वेळापत्रक
  • दंडात्मक व्याज किंवा विलंब देय शुल्क (हप्ते भरण्यास देय तारखांनंतर विलंब झाल्यास)
  • कर्ज वितरणासाठी जामीनदार आणि सह-कर्जदाराद्वारे तयार करण्यात आणलेले दस्तऐवज
  • मंजुरी पत्राची प्रत स्वीकारावी लागेल. ग्राहकास मान्यतेचे टोकन म्हणून पद्धतशीरपणे पोच मिळालेल्या मंजुरी पत्राची एक प्रत कंपनीकडे परत पाठवावी लागेल. त्यानंतर, कंपनी संबंधित प्रकरणानुसार डीलर किंवा ग्राहकांच्या नावे डी.ओ./चेक जारी करेल.
 • सध्याच्या कर्ज करारनाम्यामध्ये विलंबित देय शुल्कासाठी एका कलमाची तरतूद केलेली आहे, परंतु सूचना दिल्याप्रमाणे तो ठळक अक्षरांमध्ये नाही. पुढे जाऊन, सर्व कर्ज करारनाम्यांमध्ये या कलमाचा ठळक अक्षरात उल्लेख होईल

अटी व शर्तीतील बदलांसह कर्जाचे वितरण

 • अटी व शर्तींमधील कोणतेही बदल, जसे की व्याज दर, कालावधी, सर्व आकार/शुल्क यांमधील बदल वगैरेंबाबत, कर्जदाराला स्थानिक भाषेत लेखी स्वरूपात कळविले जातील.
 • पैसे परत मागवून घेणे, परतफेडीचा वेग वाढवणे याबाबत कोणताही निर्णय, करारनाम्यातील अटींनुसार कर्जदारास लेखी स्वरूपात कळविला जाईल.
 • सर्व थकबाकी वसूल झाल्यावर ना-हरकत दाखला देण्यात येईल. कोणतेही तारण असल्यास, त्यास ना-हरकत दाखल्यासोबत परत केले जाईल. कराराच्या अंमलबजावणीची हमी म्हणून घेतलेल्या कोणत्याही तारणाची पद्धतशीर पोच दिली जाईल आणि ते सुरक्षितपणे ठेवले जाईल. आरपीएडीद्वारे अन्य करारांमधील बॅलन्स एक्स्पोजरच्या संदर्भाने सिक्युरिटीजच्या क्रॉस होल्डिंगबाबत योग्य प्रकारे कळविले जाईल.

सर्वसाधारण

 • कर्जदाराबरोबर केलेल्या कर्ज करारनाम्याच्या अटी व शर्तींनुसारच, कंपनी कायदेशीर परवानगी असलेल्या मार्गाने उपाययोजना / कारवाई करेल.
 • उत्तरदायित्वाच्या हस्तांतरणासाठी ग्राहकांकडून केवळ लेखी विनंतीचे मूल्यमापन कंपनीद्वारे केले जाईल आणि लेखी पुष्टी / नकार ग्राहकाला योग्य प्रक्रियेनंतर २१ दिवसांच्या आत कळविला जाईल.
 • ज्या एजन्सीला विविध कामे आऊटसोर्स केली जातात / सोपविली जातात, त्यांची निवड आणि नोंदणी (एम्पॅनलमेंट) कंपनीच्या वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांनुसार करावी लागेल.
 • स्थानिक कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर प्रक्रिया अवलंबून व्यावसायिक पद्धतीने वसुलीचे काम करण्यात पारंगत असलेले एक विशेष वसुली पथक कंपनीकडे आहे. हे एक विशेष कार्य असल्याने, भरतीच्या पातळीवरच यातील गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते

तक्रार निवारण यंत्रणा

कोणतीही तक्रार / समस्या असल्यास, ग्राहक आपली तक्रार खालीलपैकी कोणत्याही मार्गाने नोंदवू शकतात:

 • वेबसाईट
 • ई-मेल ([email protected])
 • ग्राहकाने प्रत्यक्ष शाखेत येऊन
 • थेट क्रमांक: 022 6652 6185

वेबसाइट किंवा ई-मेल या दोन्हींपैकी कोणत्याही माध्यमातून ग्राहकांनी आपली तक्रार नोंदवल्यास, ग्राहकांना त्यांच्या तक्रारीची पोच देणारा एक ई-मेल / एसएमएस पाठविला जाईल व त्यासोबतच त्यांचा तक्रार क्रमांक आणि तक्रारीचे निराकरण होण्याचा अपेक्षित कालावधी याविषयी माहिती दिली जाईल.

या तक्रारी, आमच्या नोडल कस्टमर केअर एक्झिक्युटीव्हकडे (कम्प्लेंट ट्रॅकिंग मोड्यूलद्वारे) मुंबई येथील आमच्या मुख्य कार्यालयात प्राप्त होतील. तिथून या तक्रारी निराकरणासाठी संबंधित ठिकाणी व संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जातील.

जर ग्राहकांनी आपली तक्रार शाखेत येऊन नोंदवण्याचे ठरवले असेल, तर त्यांना तक्रार लेखी स्वरूपात देण्याची विनंती केली जाईल, जर ग्राहकास लिहिता येत नसेल, तर शाखेतील अकौंटंट त्यांचे तपशील एका तक्रार पत्रकामध्ये भरतील आणि त्यांना अपेक्षित निवारण कालावधीसहीत त्यांचा स्वतंत्र तक्रार क्रमांक देतील. परीणामकारक निवारण आणि एस्कलेशनची खात्री करण्यासाठी, या तक्रारींवर नोडल कस्टमर केअर एक्झिक्युटीव्ह नियमितपणे देखरेख ठेवतील.

कंपनी, प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंदणी व त्यांचे निराकरण याची खात्री तर करुन घेईलच, पण त्याचसोबत जबाबदार वरिष्ठ स्तरावर परीणामकारक देखरेख / एस्कलेशन यंत्रणा देखील सुनिश्चित करेल, जेणेकरून कोणतीही तक्रार निराकरण करण्यातून सुटणार नाही.

उत्पादन आणि सेवांच्या संदर्भात शाखांच्या निर्णयांमुळे उद्भवणारे सर्व विवाद, कमीतकमी पुढच्या उच्च स्तरावर ऐकून घेतले जातील आणि त्यांचे निराकरण केले जाईल. त्यासाठीच खालील 'तक्रार निवारण यंत्रणा' प्रस्थापित करण्यात आली आहे

तक्रार स्तर निवारण स्तर
शाखा स्तर क्षेत्रीय (टेरिटरी) स्तर
क्षेत्रीय (टेरिटरी) स्तर प्रादेशिक स्तर
प्रादेशिक स्तर विभागीय (झोनल) स्तर
विभागीय (झोनल) स्तर मुख्य कार्यालय स्तर

तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर, ग्राहकास तक्रारीचे निवारण झाल्याची पुष्टी करणारा एक मेल / एसएमएस मिळेल. या वेळी ग्राहकांना तक्रारीचे समाधानकारक निवारण झाले आहे की नाही याची पुष्टी करावी लागेल. ग्राहकांनी मेल / एसएमएसला प्रतिसाद न दिल्यास ही तक्रार बंद झाल्याचे समजले जाईल.

कंपनीच्या सर्व शाखांमध्ये, तक्रार नोंदवण्यासाठी व शाखा स्तरावर निराकरण करण्यासाठी जबाबदार असलेल्या तक्रार निवारण अधिकारी [नाव व संपर्क तपशील (दूरध्वनी / मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल पत्त्यासह) (शाखा अकौंटंट) यांची माहिती देणारे ठळक फलक प्रदर्शित केले जातील. ग्राहकाला जर निराकरण अपुरे वाटत असेल, तर हे प्रकरण वरच्या स्तरावर कसे न्यावे याविषयी तपशीलवार माहिती देखील (संपर्क तपशीलांसहीत) नमूद केली जाईल. जर एका महिन्याच्या कालावधीत तक्रार / विवादाचे निराकरण झाले नाही, तर ग्राहक यांच्याकडे अपील करू शकेल :-

अ. क्र. केंद्र एनबीएफसी लोकपाल कार्यालय केंद्राचा पत्ता कार्यक्षेत्र
1. चेन्नई द्वारा - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फोर्ट ग्लेसीस, चेन्नई 600 001 एसटीडी कोड: 044 दूरध्वनी क्रमांक 25395964 फॅक्स क्रमांक 25395488 ई-मेल: [email protected] तमिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश
2. मुंबई द्वारा - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय भायखळा कार्यालय इमारत, मुंबई मध्य रेल्वे स्टेशन समोर, भायखळा, मुंबई - 400 008 एसटीडी कोड: 022 दूरध्वनी क्रमांक 2300 1280 फॅक्स क्रमांक 23022024 ई-मेल: [email protected] महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश
3. नवी दिल्ली द्वारा - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, संसद मार्ग, नवी दिल्ली - 110001 एसटीडी कोड: 011 दूरध्वनी क्रमांक 23724856 फॅक्स क्रमांक 23725218-19 ई-मेल: [email protected] दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, चंदीगढ केंद्रशासित प्रदेश, हिमाचल प्रदेश, आणि राजस्थान व जम्मू-काश्मीर राज्य
4. कोलकाता द्वारा - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, १५, नेताजी सुभाष रोड, कोलकाता - 700001 एसटीडी कोड: 033 दूरध्वनी क्रमांक 22304982 फॅक्स क्रमांक 22305899 ई-मेल: [email protected] पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, बिहार आणि झारखंड

ग्राहकांच्या तक्रारीची प्रक्रिया आणि तक्रार निवारण धोरण, यांचे नियमितपणे पुनरावलोकन केले जाईल.

एनबीएफसीकडून जास्त व्याज आकारले जात असल्याबद्दल तक्रारी

कंपनी केवळ कराराच्या अटींनुसार व्याज घेते. मंजुरी पत्रात तसेच कर्जाच्या करारनाम्यामध्ये कराराच्या अटी स्पष्टपणे नमूद केल्या जातात आणि परतफेडीच्या वेळापत्रकानुसार हप्ते भरण्यास होणाऱ्या विलंबामुळे देय तारखेपासून हप्ता भरण्याच्या तारखेपर्यंत दरमहा ३% दराने दंडात्मक व्याज आकारले जाते. हप्ता भरण्यास ग्राहकांनी विलंब करू नये या उद्देशाने हा व्याजदर निश्चित केलेला आहे.

एनबीएफसीकडून आकारल्या जात असलेल्या अतिरिक्त व्याज दराचे नियमन

कृपया 'व्याज दर आणि जोखमीचे श्रेणीकरण' या संदर्भात आमचे धोरण पहा.

वित्तपुरवठा केलेल्या वाहनांची जप्ती

वित्तपुरवठा केलेल्या वाहनांच्या जप्तीसाठी कंपनी, खाली तपशीलवार दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करते

 • कराराची समाप्ती
 • सर्व थकबाकी (एनपीए) प्रकरणांमधील कर्जांची पुनर्मागणी
 • लवाद कलम लागू करण्याची विनंती आणि लवादाची नेमणूक
 • लवादासमोर वाहनाच्या जप्तीसाठी अंतरिम सवलतीच्या विनंतीसह करारनाम्याचा तपशील, इन्व्हॉईस, मालमत्तेसह दाव्याचे विवरण (एस.ओ.सी.) दाखल करणे.
 • लवादाकडून प्रतिवादींना एस.ओ.सी. पाठविणे आणि सुनावणीच्या तारखेची सूचना देणे
 • सुनावणी निश्चित झालेल्या तारखेला जप्तीसाठी अंतरिम सवलत मिळावी यासाठी परवानगी मागणे
 • लवादाकडून वाहनाच्या जप्तीसाठी रिसीव्हरची नेमणूक
 • अंतरिम आदेश प्राप्त झाल्यानंतर, संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याला आदेशाच्या प्रतीसहीत जप्ती आदेशाबद्दल माहिती देणे.
 • जप्ती आदेशाच्या आधारे वाहनाची जप्ती

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

 • Diverse loan offerings
 • Less documenation
 • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000