डॉ. अनिश शहा हे महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापकीय संचालक) आणि सी. ई. ओ. (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत. त्यांनी २०१४ मध्ये ग्रुप प्रेसिडेन्ट (स्ट्रॅटेजी) म्हणून महिंद्रा ग्रुपमध्ये प्रवेश केला, आणि मुख्य धोरणात्मक उपक्रमांसाठी सर्व व्यवसायांमध्ये जवळून काम केले आहे, डिजिटायजेशन आणि डेटा सायन्सेस यासारख्या क्षमताबांधणीचे काम केले आहे, आणि ग्रुप कंपन्यांमधील सिनर्जीला कार्यन्वित केले आहे. २०१९ मध्ये, सीईओच्या भूमिकेत जाण्याच्या दिशेने नियोजित प्लॅन अंतर्गत त्यांची उप-व्यवस्थापकीय संचालक पदी आणि ग्रुप सीएफओ म्हणून नेमणूक झाली, ज्या अंतर्गत त्यांच्याकडे ग्रुप कॉर्पोरेट ऑफीसची आणि ऑटो व फार्म सेक्टर वगळता सर्व व्यवसाय क्षेत्रांवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली.
२००९ ते २०१४ या दरम्यान अनिश यांनी जी.ई. (जनरल इलेक्ट्रिक) कॅपिटल इंडीयाचे अध्यक्ष व सीईओ म्हणून काम केले, जिथे त्यांनी व्यावसायिक परिवर्तन घडवून आणण्यात पुढाकार घेतला, ज्यामध्ये त्यांच्या एसबीआय कार्ड जॉइंट व्हेंचर प्रकल्पाचा समावेश होता. जी.ई. सोबत आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी जी.ई. कॅपिटलच्या युएस आणि जागतिक युनिट्समध्ये अनेक उच्चपदे भूषवली. ग्लोबल मॉर्गेज डायरेक्टरच्या पदावर असताना त्यांनी वाढ व जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने ३३ देशांमधून काम केले. जीई मॉर्गेज इन्शुरन्सचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटींग व प्रॉडक्ट डेव्हलपमेंट) असताना त्यांनी वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले व जी.ई.चा पुढचा टप्पा असलेल्या व्यवसायाची आयपीओसाठी तयारी करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जीईसोबतच्या सुरुवातीच्या काळात अनिश यांनी स्ट्रॅटेजी, ई-कॉमर्स आणि सेल्स फोर्स इफेक्टीव्हनेस या विभागांचेही नेतृत्व केले आणि जीईच्या अंतर्गत डॉट-कॉम व्यवसाय चालवण्याचा अद्वितीय अनुभवही घेतला. अनिश यांना “डिजिटल कॉकपिट” विकसित करण्यामध्ये सिक्स सिग्मा तंत्राचा असामान्य वापर केल्याबद्दल जी.ई. चा प्रतिष्ठित लेविस लॅटीमर पुरस्कारदेखील प्राप्त झाला.
जी.ई. व्यतिरिक्त जागतिक पातळीवरील इतर व्यवसायांमध्येही त्यांनी वैविध्यपूर्ण अनुभव मिळवलेला आहे. त्यांनी बँक ऑफ अमेरिकाच्या युएस डेबिट प्रॉडक्ट्स व्यवसायाचे प्रमुख म्हणून काम केले आहे, जिथे त्यांनी रिवॉर्डसंबंधी अभिनव उपक्रम सुरु केला, पेमेंट टेक्नॉलॉजीमध्ये असंख्य उपक्रम राबवले आणि ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा पुरविण्यासाठी बँकेच्या विविध विभागांसोबत जवळून काम केले आहे.
त्यांनी बोस्टन येथील बेन ऐन्ड कंपनीमध्ये स्ट्रॅटेजी कन्सल्टंट म्हणून बँकींग, ऑईल रिग्ज, पेपर, पेण्ट, स्टीम बॉयलर्स आणि वैद्यकीय उपकरणे अशा विविध उद्योगक्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांचे पहिले पद मुंबई येथील सिटीबँकेसोबत होते, जिथे त्यांनी ट्रेड सर्व्हीसेस विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून बँक गॅरंटीज आणि लेटर्स ऑफ क्रेडीट प्रदान करण्याचे काम केले आहे.
अनिश यांनी कार्नेज मेलनच्या टेपर स्कूल ऑफ बिझनेसमधून पीएचडी प्राप्त केलेली असून, त्यासाठी त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्षेत्रात डॉक्टरेट प्रबंध (डॉक्टरल थेसिस) सादर केला. त्यांनी कार्नेज मेलनमधून मास्टर्स डिग्रीदेखील प्राप्त केलेली असून, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून मॅनेजमेंट विषयात पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवला आहे. त्यांना निरनिराळ्या शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत, ज्यामध्ये विल्यम लॅटीमर मेलन स्कॉलरशिप, आयआयएमए येथे इंडस्ट्री स्कॉलरशिप, नॅशनल टॅलेंट सर्च आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांचा समावेश आहे.