आमच्या वैयक्तिक आणि सामुहिक कृती ह्या आमच्या गाभा मूल्यांवर आधारित आहेत. त्या मुल्यांवर आमच्या इतिहासाचा प्रभाव आहे आणि वर्तमानात बदलून आमच्या भविष्याला आकार देतात. आम्ही आमच्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि अपेक्षा एकत्र करून त्यांना उत्तम सेवा पुरवतो.
आमचे अस्तित्व तसेच भरभराट हे सर्व ग्राहकांमुळेच आहे. त्यांच्या बदलत्या गरजा व अपेक्षांना आम्ही त्वरित, सुहास्य वादनाने व प्रभावी प्रतिसाद देतो.
ग्राहकांना गुंतवणूक योजना आणि सेवांचे मूल्य सोपविण्यासाठी गुणवत्ता ही आमच्यासाठी कळीची आहे. आमचे काम, योजना आणि ग्राहक, कर्मचारी व भागधारक यांच्याशी संवादामध्ये सुद्धा गुणवत्ता हे अनन्य असे मूल्य आहे. “प्रथमतःच योग्य “ ह्यावर आमचा प्रगाढ विश्वास आहे. .
आमच्याकडे सेवा देण्यासाठी आम्ही सर्वोत्तम लोकांचाच शोध घेत असतो आणि नियुक्त केल्यानंतर त्यांना कामाच्या बाबतीत स्वातंत्र्य देऊन त्यांना वाढण्याची संधी देतो. नाविन्य, योग्य कारणमीमांसा करून जोखीम घेण्यास आम्ही नेहमीच पाठबळ देतो आणि उत्तम कामगिरीची अपेक्षा करतो.
पूर्वीप्रमाणेच देशाच्या गरजांशी सुसंगत असे दीर्घ पल्ल्याचे यश प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू. तसेच नैतिकतेशी कोणतीही तडजोड न करता आम्ही हे साध्य करू.
आम्ही व्यक्तिगत प्रतिष्ठेला महत्त्व देतो, मतभेद व्यक्त करायच्या अधिकाराचे समर्थन करतो व इतरांच्या वेळ व प्रयत्नांचा आदर करतो. न्यायप्रियता, विश्वास आणि पारदर्शकतेला आम्ही कृतीतून प्रोत्साहन देतो.
आम्ही भारतातील एक अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहोत, हा योगायोग खचितच नाही. एक स्पष्ट व स्वच्छ दृष्टीकोन आणि निश्चयात्मक प्रयत्नांमुळे आमच्यात जी कौशल्ये विकसित झाली आहेत, त्यामुळे आम्ही इतरांपेक्षा वेगळे तर आहोतच, पण जास्त ताकदीमुळे व आत्मविश्वासामुळे वेगाने पुढे चाल करण्यास आम्हाला मदत झाली आहे.
आमचे कर्मचारी - आमचे सामर्थ्य
फक्त काम करण्यास सक्षम नाही, तर आपल्या सामाजिक वातावरणाचे व परिस्थितीचे भानदेखील असलेले उमेदवार आम्ही निवडतो. स्थानिक परिस्थितीबद्दल त्यांना असलेल्या माहितीच्या आधारावर ते आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा पुरवू शकतात. आम्ही आमच्या डीलर्ससोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो, ज्यामुळे आमचे कर्मचारी नेहमी स्वतःहून पुढाकार घेऊन आणि पूर्ण क्षमतेने काम करु शकतात.
सखोल ज्ञान
या उद्योगक्षेत्रात दोन दशकांपासून काम करत असताना, आम्ही ग्रामीण आणि निम-शहरी मार्केट परिपूर्णपणे समजून घेतले आहे. या ज्ञानाच्या आधारावर आम्ही आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस तयार करू शकतो. याच कारणामुळे आम्ही अशा फार थोड्या कंपन्यांपैकी एक आहोत ज्या आपल्या ग्राहकांच्या सध्याच्या परिस्थितीऐवजी भविष्यात परतफेड करू शकण्याच्या क्षमतेच्या आधारावर कर्ज पुरवठा करतात.
बिझनेस मॉडेल
तळागाळातील पातळीवर कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. याच भावनेतून आम्ही २०,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळवून देतो व त्यांच्या विकासासाठी मदत करतो.
मोठा ग्राहक परिवार
४० लाख समाधानी ग्राहकांचा मोठा व सतत वाढत राहणारा परिवार ही आमची सर्वांत मोठी ताकद आहे. ग्रामीण व निम-शहरी भारतातील लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी आम्ही घेत असलेल्या अविरत परिश्रमांची पावती म्हणजे आमचा हा ग्राहक परिवार.
दमदार पालकत्व
महिंद्रा ग्रुपचे पालकत्व आणि देशभरातील डीलर्ससोबतचे घट्ट नाते या गोष्टींमुळे आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आम्हाला पुढे राहता येते.
ग्राहकांच्या गरजा
कर्ज वितरणाची जलद प्रक्रिया हे आमचे सर्वाधिक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता आणि अत्यंत लवचिकता याद्वारे आमची कर्जे सहसा २ दिवसांच्या कालावधीत वितरित केली जातात. कर्जांच्या परतफेडीसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त लवचिकता मिळवून देणारे परतफेडीचे वेळापत्रकदेखील आम्ही आखून देतो.
विस्तीर्ण जाळे
देशभरात पसरलेल्या 138० हून अधिक शाखांच्या जाळ्याद्वारे आम्ही तुमच्याजवळ महिंद्रा फायनान्सची कोणती ना कोणती शाखा नक्की असेल या गोष्टीची काळजी घेतो.
Email: [email protected]
Toll free number: 1800 233 1234 (सोमवार-रविवार, सकाळी 8 ते रात्री 10)
(Except National Holidays)
WhatsApp number: 7066331234
इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी
For illustration purpose only
Total Amount Payable
50000